डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ हे मध्य प्रदेश, राज्यातील सागर शहरातील एक केंद्रीय विद्यापीठ आहे. पूर्वी हे सागर विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते जेव्हा ब्रिटिश राजवटीत १८ जुलै १९४६ रोजी हे स्थापन झाले होते. फेब्रुवारी १९८३ मध्ये राज्य सरकारने विद्यापीठाचे नाव बदलले व सर हरिसिंह गौर यांचा आदरार्थ नवे नाव दिले. हे मध्य प्रदेशातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
मध्य प्रदेशातील सर्वात जुने विद्यापीठ असल्याने, राज्यातील बहुतांश महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होते; जसे की सरकारी विज्ञान महाविद्यालय, जबलपूर, (भारतातील सर्वात जुने विज्ञान महाविद्यालय) आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूर, (मध्य भारतातील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय).
डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ
थोडक्यात पण महत्त्वाचे.