केंद्रीय विद्यापीठ (भारत)

या विषयावर तज्ञ बना.

केंद्रीय विद्यापीठ (भारत)

भारतातील केंद्रीय विद्यापीठे ही संसदेच्या कायद्याने स्थापन केलेली सार्वजनिक विद्यापीठे आहेत आणि ती शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आहेत. ह्यात अपवाद आहेत नऊ विद्यापीठे जी इतर मंत्रालयांच्या अखत्यारीतील आहे. सर्वसाधारणपणे, भारतातील विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यता दिली जाते, जे विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, १९५६ मधून हा अधिकार प्राप्त करतात. याव्यतिरिक्त, मान्यता आणि समन्वयाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या १५ व्यावसायिक परिषदांची स्थापना करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, केंद्रीय विद्यापीठे ही केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ अंतर्गत समाविष्ट आहेत, जे त्यांचे उद्देश, अधिकार, प्रशासन इत्यादींचे नियमन करते. ह्या अनुसार १२ नवीन विद्यापीठे स्थापन केली आहेत.

१६ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशीत यादीत विद्यापीठ अनुदान आयोगाने ५४ केंद्रीय विद्यापीठे दिली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →