डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या पुरस्काराचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार असे होते.
दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.