डेनिस रिचर्ड्स

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

डेनिस रिचर्ड्स

डेनिस ली रिचर्ड्स (जन्म १७ फेब्रुवारी १९७१) एक अमेरिकन अभिनेत्री, दूरदर्शन व्यक्तिमत्व आणि मॉडेल आहे. स्टारशिप ट्रूपर्स (१९९७), थरारपट वाइल्ड थिंग्ज (१९९८), आणि द वर्ल्ड इज नॉट इनफ (१९९९) या विज्ञानकथा चित्रपटातील भूमिकांमुळे ती प्रसिद्ध झाली. उत्तरार्धात बॉन्ड गर्ल ख्रिसमस जोन्स म्हणून तिच्या अभिनयाने, टीका होत असताना, रिचर्ड्सला तिच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये यश मिळवून दिले.

रिचर्ड्सने ड्रॉप डेड गॉर्जियस (१९९९), अंडरकव्हर ब्रदर (२००२), स्कायरी मूव्ही ३ (२००३), लव्ह ॲक्चूअली (२००३), मेडियाज विटनेस प्रोटेक्शन (२०१२), व्हॅलेंटाईन (२००१), यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. एडमंड (२००५) आणि जोलेन (२००८) ही नाट्यपट आणि संगीतमय थरारपट अमेरिकन सॅटन (२०१७) मध्ये काम केले. तिच्या टेलिव्हिजन भूमिकांमध्ये सिटकॉम ब्लू माउंटन स्टेट (२०१०-११), रहस्य-थरारपट मालिका ट्विस्टेड (२०१३-१४), आणि सोप ऑपेरा द बोल्ड अँड द ब्युटीफुल (२०१९-२२) यांचा समावेश आहे.

२०११ मध्ये, तिने द रिअल गर्ल नेक्स्ट डोर, एक संस्मरण प्रकाशित केले, जे न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →