डिमॅट खाते

या विषयावर तज्ञ बना.

डिमॅट खाते म्हणजे शेअर्स, बॉंड्स, डिबेंचर्स, सरकारी रोखे आदी, कागदी स्वरूपात, शेअर्स सटिर्फिकेट्स न ठेवता 'डिमॅट' (डिमटेरियलाइजेशन) करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरूपात ज्या खात्यात ठेवता येतात असे खाते होय. या खात्याची नोंद 'सीडीएसएल' (सेंट्रल डिपॉझिटरी सव्हिर्सेस लि) कडे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या स्वरूपात असते.

शेअर मार्केटचे व्यवहार करण्यसाठी डिमॅट खाते क्रमांक उद्धृत केला जातो. साधारणपणे प्रत्येक शेअरधारकाकडे व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते असते. डिमॅट खात्याचा वापर करण्यासाठी इंटरनेट पासवर्ड आणि ट्रान्सॅक्शन पासवर्डची आवश्यकता असते. तिथून मग नवीन सिक्युरिटीज विकत घेता येतात किंवा हस्तांतरित करता येतात. व्यवहाराची पुष्टी झाल्यावर डिमॅट खात्यामध्ये खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार आपोआप होतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →