डिझाईन इनोवेशन सेंटर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पुणे विद्यापीठाचे ‘डिझाईन इनोव्हेशन सेंटर’

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठात होणा-या संशोधनाचा थेट समाजाच्या गरजा भागवण्यासाठी वापर व्हावा यासाठी विद्यापीठामध्ये “नाविन्यपूर्ण डिझाईन सेंटर” उभारणीसाठीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये देशभरात २० नवीन डिझाईन इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत आहेत. त्यातील एक DIC हे पुणे विद्यापीठात सुरू होत आहे. या ‘नाविन्यपूर्ण डिझाईन केंद्राची उपकेंद्रे नाशिक, अहमदनगर व पाबळ येथील ‘विज्ञान आश्रम’ ही असणार आहेत.

विद्यापीठातील विविध संशोधन शाखांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचे काम हे सतत चालू असते. पदवी, पदव्युत्यर, पी.एच.डी., इ. अभ्यासक्रमात संशोधन हा महत्त्वाचा भाग असतोच. विद्यार्थ्याकडून अनेक नवीन कल्पना व प्रकल्प अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केले जातात. मात्र बऱ्याच वेळा त्यांचा उपयोग शैक्षणिक पूर्ततेच्या पलीकडे जात नाही.प्रकल्प अहवाल व सादरीकरण या पलिकडे हे संशोधन पोहचत नाही. समाजाच्या गरजांवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन विद्यापीठामध्ये व्हावे हा या DICचा उद्देश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →