डब्ल्यूपीपी पीएलसी ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय संप्रेषण, जाहिरात, जनसंपर्क, तंत्रज्ञान आणि कॉमर्स होल्डिंग कंपनी आहे ज्याचे मुख्यालय लंडन शहरात आहे. २०२३मध्ये ही जगातील सर्वात मोठी जाहिरात कंपनी होती. डब्ल्यूपीपी कडे अनेक कंपन्यांची मालकी आहे. यांत जाहिरात, जनसंपर्क, मीडिया क्षेत्रातील एकेक्यूए, बीसीडबल्यू, सीएमआय मीडिया ग्रुप, एसेन्स ग्लोबल, माइंडशेर, ओगिल्व्ही VML सारख्या मार्केट रिसर्च नेटवर्कचा समावेश आहे. पब्लिसिस, द इंटरपब्लिक ग्रुप ऑफ कंपनीज, आणि ओम्नीकॉम ग्रुप यांसह ही "बिग फोर" एजन्सी कंपन्यांपैकी एक आहे.
डब्ल्यूपीपीचे समभाग लंडन स्टॉक एक्सचेंजवर घेतले-विकले जातात. ही कंपनी फूट्सी १०० निर्देशांकाचा एक घटक आहे.
डब्ल्यूपीपी (जाहिरात कंपनी)
यामागील विज्ञान आणि इतिहास.