ठाणे रेल्वे स्थानक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ठाणे रेल्वे स्थानक

ठाणे हे ठाणे शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. ठाणे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते मुंबई महानगर क्षेत्रामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. रोज सुमारे ६.५ लाख प्रवासी ठाण्याहून प्रवास करतात.

ठाणे हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक असून भारतामधील सर्वात पहिली रेल्वे मुंबईच्या बोरी बंदर ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →