ठग हे खुनी व लुटारू लोक होते. ते वैयक्तिक रित्या किंवा टोळ्यांनी काम करत असत. ते निरपराध प्रवाशांना एकटे गाठून फास लावून ठार मारीत असत. त्यांच्या जवळील पैसे व वस्तू लुटत असत. त्यामुळे त्यांना 'फांसीगर' असे संबोधले जाऊ लागले. मुघल काळापासून त्यांचे अस्तित्त्व होते. अवधपासून हैदराबाद पर्यंतच्या प्रदेशात, तसेच आजच्या राजस्थानात आणि मध्यप्रदेशात त्यांच्या टोळ्या अस्तित्त्वात होत्या.
ब्रिटिशांच्या काळात ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिंकने कर्नल विल्यम स्लिमन यास नेमले. स्लिमनने फेरंगीया नावाच्या एका ठगाकडून ठगांच्या ठिकाणांची माहिती मिळवली. १८२९ ते १८३० दरम्यान १००० ते १५०० ठगांना पकडण्यात आले. यांपैकी काही जणांना फाशी, तर काहींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. १८३५ ते १८४० पर्यंत ठगांचे अस्तित्त्व संपुष्टात आले.
ठग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.