ट्रेंट ब्रिज मैदान (नॉटिंगहॅम)

या विषयावर तज्ञ बना.

ट्रेंट ब्रिज मैदान (नॉटिंगहॅम)

ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम शहरामधील ट्रेंट नदी पलिकडील क्रिकेट मैदान आहे, जे बहुतेक वेळा कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि वेस्ट ब्रिजफोर्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड स्थित काउंटी क्रिकेटसाठी वापरले जाते. ट्रेंट ब्रिज हे नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्यालय देखील आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नॉटिंघमशायरच्या होम गेम्ससह ह्या मैदानावर ट्वेंटी२० चषकाचे दोन अंतिम सामने आयोजित झाले आहेत.

२००९ मध्ये आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० साठी मैदान वापरण्यात आले, त्यावेळी दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीचे आयोजन येथे केले गेले. मैदानाचे नाव ट्रेंट नदीवर जवळच असलेल्या मुख्य पुलावरून घेतले गेले आहे. हे मैदान मिडो लेन आणि सिटी ग्राउंड जवळ आहे, जो अनुक्रमे नॉट्स काउंटी आणि नॉटिंगहॅम फॉरेस्टचे फुटबॉल मैदान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →