थॉमस बीच अल्टर (२२ जून १९५० - २९ सप्टेंबर २०१७) हे एक भारतीय अभिनेता होते. ते हिंदी चित्रपट, आणि भारतीय रंगभूमीवरील त्यांच्या कामांसाठी प्रसिद्ध होते. २००८ मध्ये, त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांनी १९७२-७४ मध्ये भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थामध्ये अब्यास केला.
एफटीआयआयमधून पदवी घेतल्यानंतर, अल्टर मुंबईला गेले आणि लवकरच त्यांना चेतन आनंद दिग्दर्शित देव आनंद अभिनीत साहेब बहादूर (१९७७) या चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. तथापि, त्यांचा पहिला प्रदर्शीत चित्रपट रामानंद सागर यांचा चरस (१९७६) होता. यानंतर देस परदेस (१९७८), राम भरोसे, हम किसीसे कम नहीं आणि परवरिश (१९७७) मधील त्यांच्या भूमिका होत्या . अमर अकबर अँथनी (१९७७) या चित्रपटात जीवनने साकारलेल्या दुहेरी भूमिकांमधील निष्पाप व्यक्तीसाठी त्याने अभिनेता जीवनसाठी डबिंग केले.
हमारी पलटन (२०१८) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
टॉम आल्टर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?