टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक हा जेम्स ए. मिशनर यांनी लिहिलेल्या लघुकथांचा संग्रह आहे. दुसऱ्या महायुद्धातील पॅसिफिक मोहिमेदरम्यान घडलेल्या घटनांवर आधारित या कथासंग्रहाला पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक न्यू हेब्राइड्स बेटांवर (आताचे व्हानुआतु) असलेल्या एस्पिरितु सांतो आरमारी तळावर अमेरिकेच्या आरमारात लेफ्टनंट कमांडर म्हणून कार्यरत असताना त्यांनी गोळा केलेल्या निरीक्षणांवर आणि घटनांवर आधारित आहे.
१९४६ मध्ये लिहिलेल्या आणि १९४७ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे १९४९ मध्ये साउथ पॅसिफिक' या ब्रॉडवे संगीतनाटकात रूपांतर करण्यात आले. पुढे याच संगीतनाटकावरून १९५८ आणि २००१ मध्ये दोन चित्रपटांची निर्मिती करण्यात आली.
टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!