टाकणकार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

टाकणकार ही आदिवासी समाजातील एक जमात आहे.ती भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात आढळते. हा समाज अंदाजे चारशे-पाचशे वर्षापुर्वी राजस्थान-गुजरात मधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा.समाजातील लोकगीते(खूळ), लोककथा (परसंग) यातून तसे उल्लेख येतात. समाजाचे कुलदैवत मातृदेवता आहे. तिला ते 'वळेखन' या नावाने संबोधतात. या शिवाय खुऱ्याळ, मेळली, चोयटी इत्यादी नावेसुद्धा तिला आहेत. या समाजाची बोलीभाषा 'वाघरी' आहे, ती राजस्थानी व गुजराती बोलीशी जवळीक साधते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →