टरबूज ऊर्फ कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये काालिन्द असे नाव आहे . शास्त्रीय नाव
सिटरूलस लेनेटस (citrullus lanatus)असे आहे .हे फळ उन्हाळ्यात मिळते.
गोड टरबूज ओळखण्यासाठी टरबूज हातात घेऊन त्याच्या पाठीवर थाप मारून पाहतात. पिकलेल्या टरबुजातून प्रतिसादात्मक कंपने निर्माण होतात.
टरबुजाचे शास्त्रीय नाव सिट्रिलस लॅनॅटस असे आहे.
एके काळी कलिंगडे बहुधा एप्रिल, मे महिन्यातच फळबाजारात किंवा हातगाडीवर मिळत असत. मात्र पुढेपुढे लहान-मोठय़ा रस्त्यांवर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून ते थेट मे, जून महिन्यापर्यंत विक्करीला आलेली कलिंगडे आणि त्याच्या लाल लाल फोडी रस्त्यावरून जाणाऱ्यांना भुरळ पाडतात. कालिन्द (संस्कृत), तर्बुज (हिंदी), तर्मुज (बंगाली), तर्बुजि (तेलुगू), बचंग (कोंकणी), कलिंगड (मराठी) अशा विविध नावांनी हे फळ संबोधले जाते. अत्यंत रूक्ष हवामानात नापीक जमिनीत किंवा ओबडधोबड पहाडावर ते होते. याला नाममात्र पाणीपुरवठा लागतो.
कलिंगड गुणाने अत्यंत शीत असून उत्तम टॉनिक आहे. खूप रुची देणारे आणि शरीरातील लघवीचे प्रमाण वाढवणारे हे फळ आहे. कलिंगडाच्या बिया वापरून लागवड केली जाते. या बियांत फिक्कट पिवळसर रंगाचे तेल असते. कलिंगड फळांचा आस्वाद गर्भवती स्त्रीने कदापि घेऊ नये, अशी समजूत आहे. एका ज्ञानवृद्ध मित्राच्या मुलीला ‘दिवस गेलेले’ असताना ‘तू कलिंगड अजिबात खाऊ नकोस,’ असा गंभीर इशारा देऊनही ती दीर्घकाळ कलिंगड खात राहिली. बाई बाळंतीण झाली. मुलाच्या जन्माबरोबरच ती ‘देवाघरी गेली.’ फक्त बाळ वाचले. ही सत्यकथा असल्याचे सांगितले जाते.
टरबूज
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!