झनक झनक पायल बाजे हा व्ही. शांताराम दिग्दर्शित १९५५ सालचा बॉलिवूड चित्रपट आहे. यात शांतारामची पत्नी संध्या शांताराम आणि नर्तक गोपी कृष्ण मुख्य भूमिकेत आहेत. हा भारतातील रंगीत चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात बनवलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने १९५५ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचे प्रमाणपत्र जिंकले. सोबतच फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पण मिळविला. बॉक्स ऑफिस इंडिया येथे या चित्रपटाला ‘सुपर हिट’ घोषित करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झनक झनक पायल बाजे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.