सर जोसेफ डाल्टन हुकर (जन्म : इंग्लंड, ३० जून १८१७; - इंग्लंड, १० डिसेंबर १९११) हे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी वनस्पतींच्या संशोधनासाठी जगभर भ्रमण करून वनस्पती वर्गीकरणाची पद्धत विकसित केली. ग्लासगो विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच १८३९ ते ६० या दरम्यान सर हुकर यांनी ‘इरॅबस’ आणि ‘टेरर’ या जहाजांतून वनस्पती शास्त्रज्ञ या नात्याने अंटार्टिका खंडाची सफर केली. नंतर ‘बॉटनी ऑफ अंटार्टिका व्हॉयेज’ या ग्रंथातून अंटार्टिका खंडावरील वनस्पतींचे विवेचन सादर केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोसेफ हुकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.