जोश (२००० चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जोश हा २००० सालचा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक संगीतमय चित्रपट आहे जो मन्सूर खान दिग्दर्शित आहे, व्हीनस फिल्म्स निर्मित आहे आणि बी४यू फिल्म्स द्वारे वितरित केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय, चंद्रचूड सिंग, शरद कपूर आणि प्रिया गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट, प्रामुख्याने हिंदीमध्ये आणि कधीकधी कोंकणी भाषेत आहे, आणि कथानक गोव्यात घडते आणि चित्रीकरण पण गोव्यात झाले आहे. १९६१ च्या संगीतमय अमेरिकन चित्रपट वेस्ट साइड स्टोरीपासून प्रेरित काही कथानकाचे भाग आहे. हा चित्रपट १९८० मध्ये गोव्यातील रिअल इस्टेट व्यवहार आणि सांप्रदायिक हिंसाचाराची पार्श्वभूमी दाखवतो.

जोश हा चित्रपट ९ जून २००० रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर मध्यम प्रमाणात यशस्वी झाला. त्याने जगभरात ३५.०६ कोटी (US$७.७८ दशलक्ष) कमावले. समीक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिसाद मिळाला; संगीत, छायांकन, अ‍ॅक्शन सीक्वेन्स आणि कलाकारांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली, परंतु त्याच्या पटकथेवर टीका झाली. ४६ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह पाच नामांकने मिळाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →