जोनिता गांधी

या विषयातील रहस्ये उलगडा.

जोनिता गांधी

जोनिता गांधी (जन्म २३ ऑक्टोबर १९८९) ही भारतीय वंशाची कॅनेडियन गायिका आहे. तिने मुख्यतः हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत व पंजाबी, तेलुगू, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देखील काही गाणी आहे. तिच्या काही सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांमध्ये "द ब्रेकअप साँग", "मेंटल मनाधील", "चेल्लामा" आणि "अरेबिक कुथू" यांचा समावेश आहे. ती तिच्या यूट्यूब वरिल कामांसाठी देखील प्रसिद्ध आहे. २०१३ मध्ये चेन्नई एक्सप्रेसद्वारे तिचे गायनात पदार्पण झाले.

तिला चार वेळा फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारासाठीनामांकन मिळाले: २०१७ ("द ब्रेकअप गाणे" - ए दिल है मुश्किल), २०१९ ("आहिस्ता" - लैला मजनू), २०२३ ("देवा देवा" - ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा) आणि २०२४ ("हे फिकार" - ८ ए.एम. मेट्रो)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →