जॉर्ज कॅम्पबेल स्कॉट (१८ ऑक्टोबर १९२७ - २२ सप्टेंबर १९९९) एक अमेरिकन अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होता. रंगमंचावर आणि पडद्यावर त्यांची कारकीर्द गाजली. कठोर वर्तन आणि अधिकारात्मक उपस्थितीसह, स्कॉट त्याच्या कठोर परंतु जटिल व्यक्तींच्या चित्रणासाठी प्रसिद्ध झाला.
द गार्डियनने "एक लढाऊ आणि दुर्मिळ धैर्याचा अभिनेता" असे वर्णन केले आहे. त्याच्या भूमिकांमुळे त्याला दोन गोल्डन ग्लोब्स, आणि दोन प्राइमटाइम एमी मिळाले. त्याला तसेच दोन बाफ्टा पुरस्कार आणि पाच टोनी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. पॅटन (१९७०) मधील जनरल जॉर्ज एस. पॅटनच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला असला तरी, तो पुरस्कार नाकारणारा पहिला अभिनेता ठरला, व त्याने काही महिन्यांआधिच अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसला इशारा दिला होता की अभिनयाच्या कामगिरीची इतरांशी तुलना केली जाऊ शकत नाही. त्याच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिकांमध्ये ॲनाटॉमी ऑफ अ मर्डर (१९५९), द हसलर (१९६१), आणि द हॉस्पिटल (१९७१) यांचा समावेश आहे.
जॉर्ज सी. स्कॉट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?