जॉर्ज मायकेल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जॉर्ज मायकेल

जॉर्ज मायकेल (जन्मनाव जॉर्जिओस किरियाकोस पानायोटू ; २५ जून,१९६३:ईस्ट फिंचली, मिडलसेक्स, इंग्लंड - २५ डिसेंबर, २०१६) हा एक इंग्लिश गायक-गीतकार आणि संगीत निर्माता होता. याच्या संगीताच्या जगभरात अंदाजे १० ते १२.५ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. मायकेलला गीतलेखन, गायकी आणि दृश्य सादरीकरणातील सर्जनशील शक्ती म्हणून ओळखले जाते. त्याला दोन ग्रॅमी पुरस्कार, तीन ब्रिट पुरस्कार , बारा बिलबोर्ड संगीत पुरस्कार आणि चार एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक पुरस्सकारांह अनेक संगीत पुरस्कार जिंकले आहेत . बिलबोर्डच्या सर्वोत्कृष्ट १०० कलाकार" आणि रोलिंग स्टोनच्या २०० महान गायक यांमध्ये त्याचा समावेश आहे. मायकेलला २०२३मध्ये रॉक अँड रोल हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.

१९९८ मध्ये मायकेलने आपण समलिंगी असल्याचे उघड केले आणि त्यानंतर त्याने एलजीबीटी व्यक्तींच्या हक्कासाठी प्रचार आणि एचआयव्ही/एड्स ला उपाय शोधण्यासाठी काम केले. त्याच वर्षी त्याला सार्वजनिक असभ्यतेसाठी अटक झाली आणि मादक पदार्थांशी संबंधित अनेक गुन्ह्यांमध्ये हा सापडला. २०११मध्ये मायकेला न्यूमोनिया झाला होता तेव्हा तो कोमात गेला, परंतु नंतर तो बरा झाला. २०१२ मध्ये लंडनच्या अर्ल्स कोर्टवर आपली अंतिम मैफिल केली. ऑक्सफर्डशायरच्या गोरिंग-ऑन-थेम्स शहरातील आपल्या राहत्या घरी २०१६ च्या ख्रिसमसच्या दिवशी मायकेलचे हृदयविकाराने निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →