लॉर्ड कर्झन म्हणजेच जॉर्ज नथानियेल कर्झन, केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन ( जानेवारी ११, इ.स. १८५९ - - मार्च २०, इ.स. १९२५) हा लॉर्ड एल्गिन नंतर भारताचा व्हाइसरॉय होता. तो त्याआधी इंग्लंडचा परराष्ट्र सचिव होता. व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा येऊन गेला होता. त्याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी केली. या फाळणीच्या विरोधात झालेल्या जनतेच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द करण्यात आली. त्याने त्याच्या कारकिर्दीत बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांमध्ये पोलीस सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, लष्करी सुधारणा वगैरे होत्या. इ.स. १८९९चा कलकत्ता महापालिका कायदा,, १९०४ सालचा प्राचीन स्मारक संरक्षण कायदा हे त्याच्या कारकिर्दीत झाले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी लॉर्ड कर्झनने राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे विक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॉर्ज नथानियेल कर्झन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?