जॉयलँड हा २०२२ चा पाकिस्तानी पंजाबी-भाषेतील नाट्यपट आहे. हा चित्रपट सैम सादिक यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केलेला आहे. अली जुनेजो, रस्ती फारूक, अलिना खान आणि सरवत गिलानी अभिनीत हा चित्रपट विस्तारित पितृसत्ताक राणा कुटुंबावर केंद्रित आहे, जे दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी आसुसलेले आहेत.
या चित्रपटाचे जागतिक प्रदर्शन २३ मे २०२२ रोजी कान चित्रपट महोत्सव, २०२२ मध्ये झाले. तिथे याने "कॅमेरा डी'ओर" या पारितोषिकासाठी स्पर्धा केली होती. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित होणारा जॉयलँड हा पहिला पाकिस्तानी चित्रपट आहे. त्याच्या प्रदर्शनानंतर चित्रपटासाठी उभे राहून (स्टँडिंग ओव्हेशन) कौतुक केले गेले, आणि पंच (जूरी) पारितोषिक आणि क्विअर पाम पारितोषिक देखील मिळाले. जॉयलँडने इतर तृतीयपंथी संकल्पनेवर ("LGBTQ थीम") आधारित चित्रपट जसे की लुकास धोंटचा "क्लोज" आणि किरील सेरेब्रेनिकोव्हचा "चैकोव्स्कीज वाइफ" यांना मागे टाकून हे पारितोषिक जिंकले. हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला.
हा चित्रपट ९५ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटासाठी पाकिस्तानी प्रवेश म्हणून निवडला गेला.
जॉयलँड (चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!