जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री ऋषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे. हा धर्म श्रमण परंपरा पालन करतो. तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो.
अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झाले. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उदयाला आले असे मानले जाते. जैन धर्मामध्ये एकूण चोवीस तीर्थंकर यांची परंपरा सांगितली जाते . कथेनुसार ऋषभनाथ ( ऋषभदेव, आदिनाथ) हे पहिले तीर्थंकर होते तर तेविसावे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ क्षत्रियाप्रमाणेच पार्श्वनाथांचे आरंभीचे जीवन हे सुखकारक होते मात्र पुढे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी आपले उरलेले संपूर्ण आयुष्य वेचले पार्श्वनाथांचा हा काळ सामान्यपणे इसवीसनपूर्व 9 वे शतक मानला जातो.
जैन धर्म
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?