जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले भवरलाल जैन यांनी संघर्ष, दूरदृष्टी आणि आईच्या संस्कारांच्या जोरावर इतिहास घडवला. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढे सुरक्षित सरकारी नोकरीचा मार्ग उघडा होता. पण त्यांच्या अशिक्षित आई गौराईबाईंनी त्यांना एक वेगळीच दिशा दिली. त्या म्हणाल्या “नोकरी केली तर तुझे आणि कुटुंबाचे पोट भरेल… पण असे काही कर की ज्यामुळे केवळ माणसांचे नाही, तर पशू-पक्ष्यांचेही कल्याण होईल.” आईचे हे शब्द केवळ सल्ला नव्हते, तर आयुष्याचा मंत्र ठरले. त्यांनी आपल्या तीन पिढ्यांची साठवलेली केवळ ७,००० रुपयांची पुंजी मुलाच्या हाती दिली विश्वासाने, आशेने, आणि मोठं काहीतरी घडवण्याच्या स्वप्नाने.त्या छोट्याशा बीजातून उभा राहिला एक विराट वटवृक्ष Jain Irrigation Systems Limited. आज ही कंपनी केवळ उद्योग नाही, तर कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आयुष्याला पाणी देणारी, शेतीला दिशा देणारी आणि पर्यावरणाशी सुसंवाद साधणारी चळवळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →