जैतून

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जैतून

जैतून (इंग्लिश: Olive) ही ऑलिएसी ह्या कुळामधील लहान झाडाची एक जात आहे. ही झाडे भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या भागात, उत्तर इराक, इराण तसेच कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील भागात आढळतात. हे झाड सगळ्या ऋतुंमध्ये फुलते. या फुलांचा रंग पांढरा आणि आकार लहान असतो.

ऑलिव्हचा वापर प्रामुख्याने ऑलिव्ह तेल बनवण्याकरिता केला जातो. ऑलिव्हची लागवड ऑलिव्ह लाकूड, ऑलिव्हचे पान आणि ऑलिव्हचे फळ यासाठी केली जाते. ऑलिव्ह तेलाची निर्मिती हा भूमध्य समुद्र भागामधील एक मोठा उद्योग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →