जेरी ऑरबाख

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जेरी ऑरबाख

जेरोम बर्नार्ड जेरी ऑरबाख (२० ऑक्टोबर, १९३५:द ब्राँक्स, न्यू यॉर्क, अमेरिका - २८ डिसेंबर, २००४) हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक होता. हा त्याच्या मृत्यूच्या वेळी ऑरबाख ब्रॉडवे संगीतातील शेवटचा नायक आणि दूरचित्रवाणीवरील जागतिक ख्यातनाम समजला जात असे. याचे वर्णन बहुआयामी रंगमंच आणि चित्रपट अभिनेता असे केले गेले होते. ऑरबाखला टोनी पुरस्कार आणि स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले तसेच तीन एमी पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकने मिळाली.

१९९२ ते २००४ या काळात एनबीसी वरील कायदा आणि पोलिसांवर आधारित मालिकालॉ अँड ऑर्डरमध्ये एनवायपीडीमधील डिटेक्टिव्ह लेनी ब्रिस्कोच्या भूमिकेने ऑरबाखला जगभरात प्रसिद्धी मिळाली या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्यासाठी स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार तसेच उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. याशिवाय त्याने होमिसाइड: लाईफ ऑन द स्ट्रीट (१९९६–१९९९), लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (१९९९–२०००), लॉ अँड ऑर्डर: क्रिमिनल इंटेंट (२००१), आणि लॉ अँड ऑर्डर: ट्रायल बाय ज्युरी (२००५) यासह अनेक मालिकांमध्ये ही भूमिका पुन्हा साकारली. ऑरबाखने सीबीएस वाहिनीवरील मर्डर-मिस्ट्री मालिका मर्डर, शे रॉट (१९८५–१९९१) आणि द लॉ अँड हॅरी मॅकग्रॉ (१९८७–१९८८) मध्ये खाजगी हेर हॅरी मॅकग्रॉची भूमिका देखील केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →