जेनिफर मेरी मॉरिसन (जन्म १२ एप्रिल १९७९) एक अमेरिकन अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. वैद्यकीय-नाट्य मालिका हाऊस (२००४–१२) मधील डॉ. ॲलिसन कॅमेरॉन आणि वन्स अपॉन अ टाइम (२०११-१८) या एबीसी साहसी-फँटसी मालिकेतील एम्मा स्वान या तिच्या भूमिकांसाठी तिला सर्वात जास्त ओळखले जाते. तिने हाऊ आय मेट युअर मदर या हास्य मालिकेत टेड मॉस्बीच्या प्रेमीका झोई पियर्सनची भूमिका केली होती. तिने सन डॉग्स (२०१७) मधून फीचर-फिल्म दिग्दर्शनात पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेनिफर मॉरिसन
या विषयातील रहस्ये उलगडा.