UnknownUnknown
जॅक द रिपर हा एक अज्ञात सिरीयल किलर होता जो १८८८ मध्ये इंग्लंडमधील लंडनच्या गरीब व्हाईटचॅपल जिल्ह्यात आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सक्रिय होता. काही गुन्हेगारी खटल्यांच्या फायली आणि समकालीन पत्रकारितेच्या अहवालांमध्ये, खुन्याला व्हाईटचॅपल मर्डरर आणि लेदर अॅप्रन असेही म्हटले गेले आहे.
जॅक द रिपरने केलेल्या हल्ल्यांमध्ये सामान्यतः लंडनच्या ईस्ट एंडच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या वेश्या महिलांचा समावेश होता. त्यांचे पोट व गळे कापण्यात आले होते. कमीतकमी तीन पीडितांचे अंतर्गत अवयव काढून टाकल्यामुळे असा अंदाज बांधला जात होता की ह्या मारेकऱ्याला शारीरिक किंवा शस्त्रक्रियेचे ज्ञान होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर १८८८ मध्ये या खुनांचा आपसात संबंध असल्याच्या अफवा तीव्र झाल्या आणि खुनी असल्याचा दावा करणाऱ्या लोकांकडून माध्यमे आणि स्कॉटलंड यार्ड पोलीसांना असंख्य पत्रे मिळाली.
"जॅक द रिपर" हे नाव खुनी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने लिहिलेल्या "प्रिय बॉस पत्रातून" आले, जे प्रेसमध्ये प्रसारित झाले. हे पत्र खोटे असल्याचे मानले जाते आणि पत्रकारांनी या कथेत रस वाढवण्यासाठी आणि त्यांच्या वृत्तपत्रांचा प्रसार वाढवण्यासाठी ते लिहिले असावे असे मानले जाते. दुसरे, "नरकातून आलेले पत्र", व्हाईटचॅपल दक्षता समितीचे जॉर्ज लस्क यांना मिळाले आणि त्यात अर्धे जतन केलेले मानवी मूत्रपिंड होते, जे एका पीडिताकडून घेतले असल्याचा दावा होता. जॅक द रिपर नावाचा हा एकच सिरीयल किलर असल्याचा जनतेला विश्वास बसला.
व्यापक वृत्तपत्रीय लेखांमुळे रिपरला चिरस्थायी आंतरराष्ट्रीय बदनामी मिळाली आणि ही आख्यायिका अधिक दृढ झाली. १८८८ ते १८९१ दरम्यान व्हाईटचॅपल आणि स्पिटलफील्ड्समध्ये झालेल्या अकरा क्रूर हत्यांच्या मालिकेतील पोलिस तपासात सर्व हत्यांचा संबंध १८८८ च्या हत्यांशी जोडता आला नाही. पाच बळी - मेरी अँन निकोल्स, अँनी चॅपमन, एलिझाबेथ स्ट्राइड, कॅथरीन एडॉव्स आणि मेरी जेन केली - यांना "कॅनॉनिकल फाइव्ह" म्हणून ओळखले जाते आणि ३१ ऑगस्ट ते ९ नोव्हेंबर १८८८ दरम्यान झालेल्या त्यांच्या हत्येचा आपसातला संबंध सर्वात जास्त असल्याचे मानले जाते.
या खूनांची उकल कधीच झाली नाही आणि या गुन्ह्यांशी संबंधित दंतकथा ऐतिहासिक संशोधन, लोककथा आणि छद्म इतिहासाचे मिश्रण बनल्या, ज्या आजपर्यंत सार्वजनिक कल्पनाशक्तीला आकर्षित करतात.
जॅक द रिपर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!