जितेंद्र कुमार (१ सप्टेंबर १९९०) हा एक भारतीय अभिनेता आहे. कोटा फॅक्टरी मधील जीतू भैय्या, शुभ मंगल ज्यादा सावधान मधील अमन त्रिपाठी आणि ऍमेझॉन प्राइमच्या पंचायतमधील अभिषेक त्रिपाठीच्या भूमिकांसाठी तो लोकप्रिय आहे.
जितेंद्रने २०१३ मध्ये 'मुन्ना जज्बाती: द क्यू-टिया इंटर्न' मध्ये अभिनय केला, जो त्वरित व्हायरल झाला आणि ३ दशलक्ष वेळा तो पाहिला गेला. तेव्हापासून, त्याने टीव्हीएफच्या व्हिडिओंमध्ये अनेक पात्रे साकारली आहेत ज्यात टेक कॉन्व्हर्सेशन विथ डॅड, अ डे विथ, टीव्हीएफ बॅचलर, कोटा फॅक्टरी आणि इतर अनेकांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त कुमारने विनोदी स्केचेस, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. तो प्रामुख्याने टीव्हीएफ पिच्चर्समधील निराश कॉर्पोरेट कर्मचारी 'जितेंद्र माहेश्वरी', परमनंट रूममेट्समधील गोंधळलेला 'गिटू' आणि कोटा फॅक्टरीमधील 'जीतू भैया' या पात्रांसाठी प्रसिद्ध आहे.
त्याचे कोटा फॅक्टरीमधील "जीतू भैया" हे पात्र प्रचंड गाजले. अत्यंत आपुलकीने विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणारे हे पात्र तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले. या भूमिकेमुळे त्याला "जीतू भैया" म्हणूनच बऱ्याचदा ओळखले जाते. "पंचायत"साठी त्याने "विनोदी मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकला.
जितेंद्र कुमार
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!