जावेद हबीब (जन्म:२६ जून १९६३) हे एक भारतीय राजकारणी, केश रचनाकार (हेअरस्टायलिस्ट) आणि व्यवसायिक आहेत. ते जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लि.चे मालक आहेत, जे भारतातील ११५ शहरांमध्ये ८५०हून अधिक सलून आणि ६५ हेअर अकादमी चालवतात.
हबीब हे जावेद हबीब हेअर अँड ब्युटी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ही भारतातील केशलयाची (हेअर सलूनची) सर्वात मोठी सेवा साखळी आहे. अनेकजण त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भारतातील केसांचे शिक्षण आणि फॅशनचे प्रणेते मानतात. त्यानी २०१६ मध्ये प्रसिद्ध काश्मिरी फुटबॉल खेळाडू फरझान फयाजला सात वर्षांचे प्रायोजकत्व देऊ केले, परंतु हा करार पूर्ण झाला नाही. एप्रिल २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
जावेद हबीब
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.