जानकी अम्मल रामानुजन (२१ मार्च, १८९९ - १३ एप्रिल, १९९४), किंवा जानकी या भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या पत्नी होत्या. जानकीचा जन्म २१ मार्च १८९९ रोजी रंगास्वामी अय्यंगार आणि मारुदुर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या राजेंद्रम येथील रंगनायकी अम्मल यांच्या सहा मुलांपैकी चौथी मुलगी म्हणून झाला. रामानुजन आणि जानकी यांचा विवाह हा रामानुजनची आई कोमलथम्मल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. हा विवाह १४ जुलै १९०९ रोजी झाला, त्यावेळी जानकी केवळ दहा वर्षांच्या होत्या. रामानुजन यांचे वडील समारंभात सहभागी झाले नाहीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जानकी अम्मल रामानुजन
थोडक्यात पण महत्त्वाचे.