अस्तेक सैन्यामध्ये गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्ध्यांचाही खास विभाग होता (अभिजात नाहुआट्ल: ओकेलोट्ल, इंग्लिश - जाग्वार वॉरिअर किंवा जाग्वार नाईट). गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्धे खानदानी लोकांपुरताच मर्यादित होता. मूळात जाग्वार योद्धे आणि गरुड योद्धे हे सैन्यातील खास विभाग ठेवलेला असून, केवळ खानदानी लोकच ह्या विभागासाठी आवश्यक ते शिक्षण घेउन त्या विभागात प्रवेश घेउ शकत असे. त्यांच्या विश्वासानुसार गरुड आणि जाग्वार हे अनुक्र्मे सूर्य आणि चंद्र ह्यांची प्रतीके असल्याने त्यांनी ह्या प्राण्यांना आपले कुलचिन्ह मानले. बहुधा वरील अनुक्रमे कुलचिन्ह असलेले कूळ आपली परंपरा गरुड किंवा जाग्वार योद्धे ह्यांना आवश्यक असे शिक्षण घेउन चालू ठेवीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जाग्वार योद्धा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.