जागतिक साथ ही विस्तृत भूभागावर (उदाहरणार्थ अनेक खंडांवर) पसरून मोठ्या संख्येने लोकांना होणाऱ्या रोगाची होय. विस्तृत भूभागावर पसरलेल्या मात्र बाधित लोकांची संख्या स्थिर असणाऱ्या प्रदेशनिष्ठ संसर्गजन्यरोगास जागतिक साथ म्हणत नाहीत. हंगामी इंन्फ्ल्युएंझासारखे रोग जगाच्या अनेक प्रदेशांमध्ये साधारण एकाच वेळी उद्भवतात, त्यांचा इकडून तिकडे असा प्रसार होत नाही.
देवी व क्षयरोग अशा रोगांच्या अनेक जागतिक साथी इतिहासात आढळून येतात. चौदाव्या शतकात काळा मृत्यू (वा प्लेग) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक साथीने अंदाजे ७५-२०० दशलक्ष लोकांचा मृत्यू झालेला होता. अन्य मोठ्या जागतिक साथींमध्ये १९१८ मधील इंन्फ्ल्युएंझा (स्पॅनिश फ्ल्यू) आणि २००९ मधील इंन्फ्ल्युएंझा जागतिक साथ (एच१एन१) यांचा समावेश होतो. सद्यकालीन जागतिक साथरोगांमध्ये एचआयव्ही / एड्स आणि कोव्हिड-१९ यांचा समावेश आहे.
जागतिक साथ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.