जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागतिक वन दिवस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.