जवस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जवस

जवस (शास्त्रीय नाव: Linum usitatissimum; लिनम युसिटेटिसियम ) हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. जवसाचा उगम इजिप्त देशातील आहे. महाराष्ट्रात व भारतात जवस हे हिवाळ्यातले (रब्बीचे) पीक आहे. याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया असतात. त्या बियांपासून तेल निघते. विदर्भात जवसाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. याच्या वापराने दृष्टी मंदावते आणि नपुंसकत्व येते असा समज आहे. जवसाच्या बियांची भुकटी करून चविष्ट चटणी करतात.

खोडाच्या अंतर्सालीपासून धागा निघतो.जवस हे समशीतोष्ण प्रदेशातील रोप आहे. रेशेदार पिकात याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच्या रेशेपासुन कापड, दोरी, रस्सी आणि टाट बनवले जाते याच्या बियांपासून तेल निघते या तेलाचे वापर वार्निश, रंग, साबुन, रोगन, पेन्ट तयार करण्यासाठी केला जातो. चीन सनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे रेशे साठी सनला उत्पादित करणारे देशात रूस, पोलैण्ड, नीदरलैण्ड, फ्रांस, चीन आणि बेल्जियम प्रमुख आहे व बी काढण्यातील देशात भारत, संयुक्त राज्य अमरीका आणि अर्जेण्टाइनाचे नाव उल्लेखनीय आहे. सनचे प्रमुख निर्यातक रूस, बेल्जियम तथा अर्जेण्टाइना आहे. आयुर्वेदात जवसाला मंदगंधयुक्त, मधुर, बलकारक, किंचित कफवात-कारक, पित्तनाशक, स्निग्ध, पचनास भारी, गरम, पौष्टिक, कामोद्दीपक, पाठीच्या दुखणे कमी करणारे व सूजेला नष्ट करणारे म्हणले अाहे. गरम पाण्यात टाकून बीज किंवा याच्या बरोबर एक तृतीयांश भाग ज्येष् मधाचे चूर्ण मिसळून क्वाथ (काढा) बनवला जातो, जो रक्तातिसार आणि मूत्र संबंधी आजारात उपयुक्त मानला जातो..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →