जलप्रदूषण

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय. जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. नदी आणि पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वीच्या काळात आपण दात घासण्यासाठी दंतमंजन, खडीसाखर, किंवा माती, आंघोळीसाठी उटणे, दूध, डाळीचे पीठ, आणि भांडी-टॉयलेट साफ करण्यासाठी सोडा, लिंबू, राख यासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरत होतो. या गोष्टींचा वापर केल्याने पाण्यात रासायनिक प्रदूषण होत नाही आणि निसर्गाला हानी पोहोचत नाही.

आजकाल रासायनिक साबण, डिटर्जंट, आणि टॉयलेट क्लिनर यांचा वापर वाढल्याने नदी, नाले आणि पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. जर आपण पुन्हा नैसर्गिक पर्यायांकडे वळलो—जसे की, सोडा, राख, उटणे, शिकेकाई—तर पाण्याचे प्रदूषण नक्कीच कमी होऊ शकते. यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे, जागरूकता वाढवणे आणि सरकारनेही पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे."

हवा,पाणी आणि अन्न" या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला माणसे जबाबदार आहेत.

जलप्रदूषण ही संपूर्ण जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व इतर सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे.

नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते. या वर उपाय योजना करणे अतिशय महत्वाचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →