जनार्दन परब

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जनार्दन परब (इ.स. १९४५; २ एप्रिल. इ.स. २०१६ :मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

परब यांचे बालपण कोकणात गेल्यावर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईला आले. तरुण वयातच ते एकांकिका व प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. यात त्यांना विजया मेहता व इतर नटांनी मदत केली.

त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →