जनरल हे भारतीय सैन्यातील चतुर्थ तारांकित जनरल अधिकारी श्रेणी आहे. ही भारतीय सैन्यातील सर्वोच्च सक्रिय रँक आहे. जनरल श्रेणी ही लेफ्टनंट जनरलच्या तृतीय तारांकित श्रेणीच्या वर आणि फील्ड मार्शलच्या पंचम तारांकित रँकच्या खालील, मुख्यत्वे युद्धकालीन किंवा औपचारिक रँक असते.
लेफ्टनंट जनरल आणि मेजर जनरल सारख्या खालच्या जनरल ऑफिसर रँकपासून वेगळे करण्यासाठी जनरलला पूर्ण जनरल किंवा चतुर्थ तारांकित (फोर-स्टार) जनरल म्हणून संबोधले जाऊ शकते. भारतीय नौदलात समतुल्य दर्जा अॅडमिरल आणि भारतीय हवाई दलात एर चीफ मार्शल या पदांचा आहे.
२०२२ पर्यंत भारतीय सशस्त्र दलात दोन सेवारत पूर्ण जनरल आहेत : जनरल अनिल चौहान ( संरक्षण दलप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आणि अध्यक्ष, चीफ ऑफ स्टाफ कमिटी) आणि जनरल मनोज पांडे (लष्कर प्रमुख).
जनरल (भारत)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!