जनता पक्ष

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जनता पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. हा पक्ष, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, जयप्रकाश नारायण व ईतर अनेक राजकीय पक्षांनी (काँग्रेस-O, भारतीय लोकदल/जनसंघ) एकत्र येऊन स्थापन केला होता.



आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्तरीत्या स्थापन झालेला जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.

जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-



भारतीय जनता पक्ष

राष्ट्रीय जनता दल

संयुक्त जनता दल

जनता दल (धर्मनिरपेक्ष)

बिजू जनता दल

कर्नाटक जनता पक्ष

विदर्भ जनता पक्ष

समाजवादी जनता पार्टी

जननायक जनता पार्टी

जनशक्ती जनता दल, वगैरे वगैरे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →