जखीण

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जखीण हा स्त्री भुताचा एक प्रकार आहे. असाही समज आहे की या प्रकारातले भूत हे जख्ख म्हातारीचे रूप धारण करून व्यक्तीस बाधते..

जखाई नावाने सुद्धा ओळखली जाणारी ही महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील लोकदैवतांमध्ये पूजली जाणारी एक ग्रामदेवता किंवा यक्षस्वरूप स्त्री-देवता आहे. प्राकृत आणि कोकणी लोकसंस्कृतीत जखीण हा शब्द संस्कृतमधील यक्षी किंवा यक्षिणी या शब्दावरून व्युत्पन्न झाला असल्याचे मानले जाते.

विशेषतः कोकण किनारपट्टीवरील प्रदेशांत आणि पश्चिम महाराष्ट्रात जखीण देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. लोकधारणांनुसार जखीण ही मुख्यत्वे कुलदेवता, ग्रामरक्षक देवता किंवा यक्ष परंपरेशी संबंधित निसर्गदेवता म्हणून मानली जाते. अनेक ठिकाणी 'जखाई-मखाई' अशा जोडीनेही या देवतेचा उल्लेख आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →