जंगली हा १९६१ चा भारतीय विनोदी चित्रपट आहे जो सुबोध मुखर्जी निर्मित आणि दिग्दर्शित आहे. या चित्रपटाचे संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले आहे आणि गीते शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात शम्मी कपूर, सायरा बानू (तिच्या पहिल्या चित्रपट) मुख्य भूमिकेत आहेत, तसेच शशिकला, अनूप कुमार, ललिता पवार यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. सायरा बानू यांना ह्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेर पुरस्कारांचे नामांकन मिळाले.
या चित्रपटाने शम्मी कपूर यांना त्यांच्या कारकिर्दीत व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली. बॉक्स ऑफिस इंडियाने या चित्रपटाला "सुपर-हिट" म्हटले आहे ज्याची निव्वळ कमाई १.७५करोड होती. "चाहे कोई मुझे जंगली कहे" हे गाणे पी.एल. राज यांनी कोरिओग्राफ केले होते. या चित्रपटाचे तेलुगूमध्ये सारदा रामुडू (१९८०) असे पुनर्निर्मित करण्यात आले, ज्यामध्ये एन.टी. रामाराव आणि जयसुधा यांनी अभिनय केला होता.
जंगली (१९६१ चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?