चौडी तथा चौरी हे गोव्यातील एक गाव आहे. हे गाव मडगांवच्या दक्षिणेस ३३ किमी वर आहे.
हे शहर दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्याचे प्रशासकीय आणि व्यावसायिक केन्द्र आहे. हे गाव काणकोण परिसरातील मुख्य बाजारपेठ आणि दळणवळणाचे प्रमुख केंद्र आहे. चौरी हे पालोलेम, अगोोंडा आणि पटणे या दक्षिण गोव्यातील प्रमुख किनाऱ्यांजवळ वसलेले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या गावाला विशेष महत्त्व आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरील 'काणकोण' रेल्वे स्थानक या गावाच्या अगदी जवळ असून, येथे स्थानिक बाजारपेठ, सरकारी कार्यालये, बस स्थानक आणि इतर नागरी सुविधा उपलब्ध आहेत.
चौरी
या विषयावर तज्ञ बना.