चैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग (इ.स.१८ फेब्रुवारी १४८६ - इ.स.१४ जून १५३४) बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत व वैष्णव पंथाचे, भक्तिमार्गाचे प्रचारक व भक्तिकाळातील प्रमुख संतकवींपैकी एक होते. त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापला. भगवान श्रीकृष्णाचे उत्साही भक्त होते.
चैतन्य चरितामृत मते चैतन्य महाप्रभुंचा जन्म १८ फेब्रुवारी १४८६ शक संवत १७०७ मध्ये फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नादिया) या गावी झाला,ज्याला आता 'मायापूर' असे म्हणतात. त्यांचा जन्म संध्याकाळी सिंहराशी लग्नातील चंद्रग्रहणाच्या वेळी झाला.
त्यावेळी पुष्कळ लोक शुद्धीकरणासाठी हरिनामचा जप करीत गंगा स्नानाला जात होते.मग विद्वान ब्राह्मणांनी चैतन्याचा जन्मकुंडलीच्या ग्रहांचा आणि त्यावेळी उपस्थित शकुनाचा अंदाज लावला की हा मुलगा आयुष्यभर हरिनामचा उपदेश करेल. बालपणात त्याचे नाव विश्वंभर म्हणले जात असले तरी सर्व लोक त्याला निमाई म्हणत असत, कारण तो कडुलिंबाच्या झाडाखाली सापडला होता. किंवा आई त्यास ‘निमाई’(निंब वृक्षाच्या सावलीत जन्मला म्हणून) म्हणायची.
गौर वर्णामुळे लोक चैतन्य महाप्रभुंना 'गौरांग', 'गौर हरि', 'गौर सुंदर' इ. म्हणले जात असे . त्यांच्या वडिलांचे नाव श्री जगन्नाथ मिश्रा (टोपणनाव पुरंदरमिश्र) आणि आईचे नाव शची देवी आहे. किशोरवयातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.
त्यांनी भजन-गायनाच्या नवीन शैली प्रसृत केली व राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू-मुस्लिम एकता, जातपात, उच्चनीचतेची भावना दूर सारण्याची प्रेरणा दिली व लुप्तप्राय झालेले वृंदावन पुन्हा वसवले. जीवनातील अंतिम काळ त्यांनी वृंदावनातच घालवला. त्यांनी आरंभलेल्या नामसंकीर्तनाचा व्यापक व सकारात्मक प्रभाव आजही पाश्चात्य जगतात आहे . असेही म्हणले जाते, की जर गौरांग नसते, तर वृंदावन आजवर एक मिथकच राहिले असते . वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्ण व राधा यांचा संयुक्त अवतार मानतात . चैतन्य महाप्रभूंवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यांत कृष्णदास कविराज गोस्वामी विरचित चैतन्य चरितामृत, वृंदावनदास ठाकूर विरचित चैतन्य भागवत व लोचनदास ठाकुरांचा चैतन्य मंगल या ग्रंथांचा अंतर्भाव होतो.
चैतन्य नीलाचल येथे गेले आणि जगन्नाथांच्या भक्ती आणि उपासना करण्यासाठी १८ वर्षे सतत तेथेच राहिले. याच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने गृहस्थांचा आश्रम सोडला आणि संन्यासदीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे नाव त्यांनी धारण केले व याच नावाने ते प्रख्यात झाले.
चैतन्यांनी संन्यासदीक्षा झाल्यावर ते निलंचलामध्ये गेले.यानंतर दक्षिण भारतातील श्रीरंग क्षेत्र व सेतु बंध इत्यादी ठिकाणीही राहिले. त्यांनी हरिनामाचे महत्त्व देशाच्या कानाकोपरात प्रसार केला.
त्यांनी वृंदावनमध्ये सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. ते आहेत: - गोविंददेव मंदिर , गोपीनाथ मंदिर , मदन मोहन मंदिर , राधा रमण मंदिर , राधा दामोदर मंदिर , राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर. त्यांना असे 'सप्तदेवालय 'म्हणतात.
चैतन्य महाप्रभू
यामागील विज्ञान आणि इतिहास.