चेन्नईयिन एफ.सी. (इंग्लिश: Chennaiyin FC) हा भारताच्या चेन्नई शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो.
२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यमान भारतीय क्रिकेट खेळाडू महेंद्रसिंग धोणी व बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ह्यांनी एकत्रितपणे चेन्नईयिन क्लबाची स्थापना केली.
२०१४ सालच्या आय.एस.एल.च्या पहिल्या हंगामामधील साखळी फेरीमध्ये सर्वाधिक गूण मिळवून चेन्नईयिन पहिल्या स्थानावर होता. परंतु उपांत्य फेरीमध्ये केरळ ब्लास्टर्सकडून त्याला पराभव पत्कारावा लागला.
चेन्नईयिन एफ.सी.
यामागील विज्ञान आणि इतिहास.