चिपळूण विधानसभा मतदारसंघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चिपळूण विधानसभा मतदारसंघ - २६५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार चिपळूण मतदारसंघात रत्‍नागिरी जिल्ह्याच्या १. चिपळूण तालुक्यातील कलकवणे, शिरगांव, सावर्डे, चिपळूण ही महसूल मंडळे आणि चिपळूण नगरपालिका क्षेत्र आणि २. संगमेश्वर तालुक्यातील माखजन, कडवाई, फणसवणे, वाशी तर्फ संगमेश्वर, देवरूख आणि आंगवली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. चिपळूण हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम हे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →