चित्रा मुद्गल (जन्म : चेन्नाई, १० सप्टेंबर, १९४४) या एक हिंदी लेखिका आहेत. असे असले तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. त्या एम.ए. (फाइन आर्ट) आहेत. सुधा होरास्वामीं या गुरूंकडून त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत.
चित्रा मुद्गल यांची ४ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, ३ नाटके, १० बालकथा-नाटके आणि इतर अन्य पुस्तके मिळून सुमारे ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या आवा या कादंबरीचा त्याच नावाचा मराठी अनुवाद वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी केला आहे.
चित्रा मुद्गल
या विषयावर तज्ञ बना.