चित्रा पालेकर अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या आणि लेखिका आहेत. समलैंगिक व्यक्तींना समान हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत त्यांचा सहभाग असतो. पालेकर ह्या अर्थशास्त्रात एमए आहेत. चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांच्या त्या प्रथम पत्नी आहेत.
पालेकर यांची कलेतली कारकीर्द १९६७ मध्ये, मुंबईतल्या प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झाली. त्यांनी ‘थिएटर युनिट’, ‘रंगायन’, ‘अनिकेत’ इत्यादी संस्थांच्या हिंदी-मराठी नाटकांत भूमिका करत राज्य-नाट्य स्पर्धेत बक्षिसे मिळवली.
१९८०मध्ये चित्रा पालेकर चित्रपट माध्यमाकडे वळल्या. त्यांची प्रथम निर्मिती व प्रमुख भूमिका असलेल्या आक्रीत या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. त्याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सहदिग्दर्शक आणि निर्मिती-संकल्पक या भूमिकाही पार पाडल्या.
चित्रा पालेकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.