चित्ता

थोडक्यात पण महत्त्वाचे.

चित्ता

'चित्ता' हा सर्वात वेगाने पळणारा म्हणजे ताशी १२० किलोमीटर वेगाने धावणारा प्राणी आहे. चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक असून मराठीत या प्राण्याला 'चित्ता', गुजरातीत 'ચિત્તો' ('चित्तो') व हिंदीत 'चीता' असे म्हणतात. भारतात आफ्रिकेतील नामीबिया देशातून 8 चित्ते विमानाने आणण्यात आले, त्यात 3 नर 5 माद्या आहेत. त्यांना मध्यप्रदेश मधील कुनो नॅशनल पार्क मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते सोडण्यात आले. 70 वर्षांपूर्वी भारतातून चित्ते नाहीसे झाल्याची घोषणा सरकारने केली होती, त्यानंतर परत भारतात चित्ते आणण्याच्या प्रयत्नांना यावर्षी म्हणजे 2022 मध्ये यश आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →