चिंटू

थोडक्यात पण महत्त्वाचे.

चिंटू ही सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक नोव्हेंबर २१, इ.स. १९९१ रोजी सकाळ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक आबालवृद्धांचा लाडका बनला आहे. दोन वर्षे ही चित्रकथा लोकसत्ता वृत्तपत्रातून प्रकाशित होत होती.

या चित्रकथेतील पात्रांवर आधारित असलेला एक मराठी चित्रपट चिंटू याच नावाने २०१२ मध्ये प्रदर्शित झाला.

सध्या इंस्टाग्रामवर chintoo_toon ह्या पानावरदेखील ही चित्रकथा प्रकाशित केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →