चार्वाक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक हे नाव चारु (गोड) आणि वाक् (वाणी) या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते.

चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. चार्वाक ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नास्तिक मताची प्रवर्तक असलेली, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे. परंपरा ..शंकर..पुरंदर.. बृहस्पती.. अशी धरली जाई. कौटिलीय अर्थशास्त्रात लोकायत हे आन्वीक्षिकी म्हणजे तर्कविद्येचा भाग असल्याचे म्हणले आहे. पण या नास्तिक मताचा प्रवर्तक म्हणून, चार्वाक नावाची कोणी व्यक्ती खरोखरच होऊन गेली, याला इतिहासात पुरावा नाही.

चार्वाक ही व्यक्ती काल्पनिक होती, एकच होती का त्या विशिष्ट जीवनवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्यांकरिता वापरलेली उपाधी होती, या बाबत तज्ज्ञांत वेगवेगळी मते आहेत. असे असले तरी हे चार्वाक जडवादी व भौतिकवादी अशा लोकायत नावाच्या अवैदिक तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते या बाबत दुमत नाही. तत्कालीन इतर धर्मीय तत्त्वचिंतकांनी त्यांच्या या अनीश्वरवादी विरोधकांवर उपभोगवादी असल्याचा शिक्का मारून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. महाभारतात चार्वाक नावाच्या कौरवांच्या बाजूने असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख आढळतो, पण तिथे लोकायत तत्त्वज्ञानाची कोणतीही चर्चा किंवा त्या व्यक्तिरेखेचा कोणत्याही विशिष्ट तत्त्वज्ञानाशी संबध असल्याची नोंद आढळून येत नाही. काही काळाने चार्वाकाचे दोन प्रकारचे अनुयायी बनले. त्यातील एका बाजूचे अनुयायी आस्तिक विचाराचे समर्थन करत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →